– चामोर्शी येथे घरोघरी जाऊन दिली शासनाच्या योजनांची कामांची व निर्णय यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने घर चलो अभियानाला सुरुवात झाली असून या अभियानाचा शुभारंभ आमदार डॉ.देवराव होळी यांच्या उपस्थितीमध्ये चामोर्शी येथील घरोघरी जाऊन राबविण्यात आला. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना अभियान उत्स्फूर्तपणे राबवण्याचे आवाहन आमदार होळी यांनी केले.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य व केंद्र सरकारने केलेल्या जनहितकारी योजनांची, निर्णयांची व कार्याची माहिती घरोघरी जाऊन दिली. यावेळी प्रदेशाच्या वतीने देण्यात आलेली पत्रके विकास कामांचा अहवाल दर्शविणारे पत्र आमदार डॉ. देवराव होळी यांनी घरोघरी दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युवा मोर्चाचे प्रत्येक राठी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.