The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : स्वच्छ भारत मिशन टप्पा ०२ अंतर्गत वडसा येथील स्वच्छता टिमने ग्रामपंचायत रांगी येथे भेट देऊन केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रांगी ग्रामपंचायतला भेट देऊन केलेल्या कामाची पाहणी केली. गावात बांधकाम केलेल्या सार्वजनिक शौचालय नियमित वापर होत आहे कि नाही, शासकीय कार्यालयातील शौचालय , शाळा व अंगणवाडी येथील शौचालय तथा घनकचरा व्यवस्थापनाकरिता वापरात असलेले सेरीगेशण शेड, तथा कंपोष्ट पिट, शोषखड्डे ची पाहणी केली, तथा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मार्गदर्शन केले .
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंचायत समिती वडसा (देसाईगंज) येथून आलेल्या टीम मध्ये काळबांधे विस्तार अधिकारी पं.स. वडसा, सहाय्यक गटविकास अधिकारी कोमलवार पं.स. धानोरा, लोखंडे BRC वडसा, बागमारे B R C वडसा, लांजेवार वडसा, ग्रामपंचायत रांगी च्या सरपंचा सौ.फालेश्वरी गेडाम , ग्रामपंचायत अधिकारी बांबोळे, ग्रामपंचायत उपसरपंच नुरज हलामी, सदस्य दिनेश चापले, शशिकांत साळवे, राकेश कोराम, विद्याताई कपाट, अर्चनाताई मेश्राम, शशिकलाताई मडावी, दिवाकर भोयर, संगणक परिचालक नितीन कावळे तथा सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील गणमान्य मंडळी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )