– दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : अवैधरीत्या दारूची तस्करी होत असलेल्या वाहनाला सापळा रचून कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला धडक देवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचां मोठ्या शिताफीने पाठलाग करून मुसक्या आवळल्या. सदर कारवाई प्रकरणी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरव धामदेव कोडाप, रा. बोदली, ता. जि. गडचिरोली व प्रणय सुधिर पंदिलवार, रा. काटली, ता. जि. गडचिरोली असे आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली येथे दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली असता पथकाने चंद्रपूर – गडचिरोली मार्गावर नाकाबंदी करून दारूचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक गौरव कोडप याने आदेशाला न जुमानता वाहनासह वाकडी – समना मार्गे पळविले. दरम्यान पथकाने आपल्या वाहनाने पाठलाग सुरु केला असता पोलीसांनी वारंवार आरोपी वाहन चालकास वाहन थांबविण्याबाबत आवाज दिला असता, वाहन चालक व त्याच्या साथीदाराने त्यांचे वाहन न थांबविता भरधाव वाहनातून पोलीसांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अंदाजे 30 ते 35 किलोमिटर पाठलाग करीत असतांना वाहन चालकाने त्याचे ताब्यातील दारुने भरलेले वाहन थांबविले. पोलीस पथकाने वाहन चालकास व वाहनास ताब्यात घेण्याच्या उद्देशाने त्यांचे वाहनातून उतरुन दारुच्या वाहनाकडे जात असतांना वाहन चालकाने परत शिवीगाळ करून पोलिसांवर दारुने भरलेले वाहन रिव्हर्समध्ये भरधाव वेगाने अंगावर आणले. पोलीसांनी आपला बचाव करून रोडच्या कडेस उडी घेतल्याने त्यांना दुखापत झाली नाही परंतु, शासकिय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून ते क्षतीग्रस्त झाले. याचाच फायदा घेवून आरोपीं हे घटनास्थळावरुन दारुने भरलेले त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन घेवून जंगलमार्गे पसार झाले. गडचिरोली येथे आरोपीतांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शासकिय कामात अडथळा याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपासात घेतला असता गुन्ह्राचे तपासी अधिकारी भगतसिंग दुलत यांनी त्यांचे गोपनिय बातमीदार सक्रिय करून आरोपी नागपूर येथे पळून गेले असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील तपास पथक नागपूर येथे रवाना होवून पोलीस स्टेशन सिताबर्डी, नागपूर शहर हद्दीत लपून बसलेले आरोपी गौरव धामदेव कोडाप व प्रणय सुधिर पंदिलवार यांना ताब्यात घेवून आज ११ ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक, गडचिरोली नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. उल्हास भुसारी, सपोनि. भगतसिंग दुलत, पोहवा सतिष कत्तीवार, प्रेमानंद नंदेश्वर, अकबर पोयाम, राकेश सोनटक्के, पोअं श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, शुक्राचारी गवई व उमेश जगदाळे यांनी पार पाडली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath #crimenews )