कुरखेडा : मशाल रॅलीतुन अवैध दारूविक्री थांबविण्याचे आवाहन

243

-मालदुगी येथे जुगार व दारूबंदीचा निर्णय
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे ग्रामपंचायत समिती, तंटामुक्त समिती व शक्तीपथ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गाव सभेत अवैध जुगार व दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. सोबतच गावातून दारूबंदीचे नारे लावत मशाल रॅली काढून अवैध दारूविक्री तत्काळ थांबवा अन्यथा कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले.
मालदुगी येथे अवैध दारूविक्री सुरु असल्याने युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे तसेच गावाच्या विकासावरही विपरीत परिणाम पडत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी महिलांनी व ग्रामपंचायत समिती, तंटामुक्त समिती तसेच ग्रामस्थांनी दारूबंदी लागू केली आहे. गावातफ कुणीही दारूविक्रीफ करताना आढळून आल्यास पहिला दंड पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा दारूविक्री केल्यास १० हजार तसेच वारंवार निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. सोबतच दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतद्वारे मिळणारे संपूर्ण शासकीय दाखले बंद करण्याचेही सभेत ठरविण्यात आले. विशेष म्हणजे जुगार खेळणाऱ्यांकडून सुद्धा दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील महिलांनी गावातून मशाल रॅली काढून व्यसनमुक्तीचे गाणे व नारे लावत जागृती केली.
तंटामुक्त समिती अध्यक्ष हरीराम चौरिकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये पोलिस पाटील यशोधरा नंदेश्वर, ग्रामसेविका बरडे, दारूबंदी समिती अध्यक्ष राजेश्वर गाये, यशवंत चौरीकर, आरती उईके, प्रदीप मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शीतल मडावी, प्रेमदास सहारे, तिलोत्तमा मुंगमोडे, गीता गुरनुले, वनिता राऊत, मीराबाई कोडापे, शालू भोयर, माधवी घोडाम, दिवाकर गाये, गणेश राऊत, मनीषा वनकर, कलाबाई गुरनुले, रुख्माबाई गाये, सविता तुलावी, भारती चौरीकर, दुर्गा राऊत, ज्ञानेश्वर चौरीकर, भूपेश गाथे, ,मुक्तीपतर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम व तालुका प्रेरक जीवन दहीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here