– वाहन धारकांची होत आहे आर्थिक पिळवणूक
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २१ : येथे एकमेव असलेले भारत पेट्रोल पंप मागील पाच दिवसापासून बंद असल्याने परिसरातील वाहन धारकांना याचा मोठा फटका बसत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. तसेच पुन्हा पाच दिवस पेट्रोल पंप बंद राहिल्यास त्याचा आर्थिक भूदंड मोठ्या प्रमाणात परिसरातील वाहन धारकांना परवडणारा नअसल्याने धानोरा येथील पेट्रोल पंप नियमित सुरू करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
धानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून अतिदुर्गम भाग आहे. परिसरातील लहान – लहान गावातील नागरिक तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन, खाजगी, व्यापारी असे अनेक कामाकरिता ३५ ते ४० किलोमीटर अंतरावरून नागरिक येत असतात. प्रत्येक व्यक्तीकडे आज दुचाकी व चारचाकी वाहने आहेत परंतु पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनाने आलेल्या लोकांना आल्या पावली परतावे लागत आहे. तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असून अनेक वाहनधारक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्याकरिता गेले असता पेट्रोल पंप बंद असल्याचे दिसून येते आणि तसे बोर्ड सुद्धा लावण्यात आले आहे. पंपाच्या मशिनमधे बिघाड निर्माण झाल्याने पंप बंद असल्याचे सांगितले जाते. धानोरा येथुन वाहनांना समोर जाण्यासाठी गाडीत पेट्रोल, डिझेलची नितांत गरज आहे. पण पेट्रोल पंपावर बसवलेली मशिन बंद असल्याने पुन्हा किती दिवस दुरुस्त होनार नाही असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
तरी पण याचा आर्थिक भूदंड ग्राहकांना पडत असल्याने अनेक ठिकाणी पेट्रोलचे चढे भाव दिसून येतात. प्रती लिटरला ग्राहकांना १३०, १४० तर कुठे १५० रुपये सुद्धा मोजावे लागत असल्याने खूप मोठ्या प्रमाणात वाहन धारकांची आर्थिक पिळवणूक धानोरा व परिसरात सुरू आहे. तरी पेट्रोल पंप धारकांनी त्वरित मशीन दुरुस्त करून पेट्रोल पंप नियमित सुरू करण्याची मागणी धानोरा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora)