– पत्रकार परिषदेतून पाठिंबा दर्शवित केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन अदयापही महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नाही. भाजपतर्फे विद्यमान आमदार डाॅ. देवराव होळी हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून या क्षेत्रासाठी इतरही उमेदवार भाजपाकडून इच्छुक दिसून येत आहे. मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन विद्यामान आमदा डाॅ. देवराव होळी यांना उमेदवारी देण्यात यावी याकरिता महायुती मधील पदाधिकारी सरसावले असुन आज झालेल्या पत्रकार परिषदेतुन आ. डाॅ. होळी यांना पांठींबा दर्शवित आ. डाॅ. होळी यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही महायुतीमधील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच भाजपाचे पदाधिकारी व डाॅ. देवराव होळी मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार डाॅ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्हयात यापूर्वी कधीच न झालेला वकास करून दाखविलेला आहे. त्यानी भाजपासोबत मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांना सोबत घेवून या ठिकाणी काम केले आहे त्यामुळे विकास कामांच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे असेही उदगार पत्रकार पत्रकार परिषदेदरम्यान मित्र पक्षांनी केला आहे.
पुढे बोलतांना म्हणाले की, आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासनाशी, प्रशासनाशी संघर्ष करून अखेर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले. यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील स्थानिकांनाही वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. कोटगल बॅरेज, अनेक उपसा सिंचन योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली, जिल्ह्याने उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेतली, जिल्ह्यात रस्ते पुलांसाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्हयात मागील ५० वर्षात न झालेली विकासकामे करून या क्षेत्राचा कधी नव्हे एवढा विकास करून दाखवलेला आहे अशा विकासाची दृष्टी असणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी यांना निवडणुकीत पराभूत करणे इतर कोणत्याही पक्षांना कठीण आहे. त्यामुळे आमदार होळी हे जिंकून येणारे उमेदवार आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निवडणुकीत जिंकून घेण्याची क्षमता असणाऱ्या डॉ. होळी यांनाच उमेदवारी देण्यात द्यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.