The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : बलात्काराच्या गुन्हयातील आरोपी अनादी अमुल्य सरकार ( वय ४० ) हा गेल्या १४ वर्षांपासून फरार होता. तब्बल १४ वर्षांनी त्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनादी अमुल्य सरकार, रा. देशबंधूग्राम ता. मुलचेरा याला २०१२ मध्ये बलात्काराच्या गुन्हयात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाबाहेर आणुन बेडया लावत असतांना अनादी सरकार हा पोलीसांना चकमा देवून फरार झाला. पोलीसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही. २०१२ पासून पोलीसांच्या तावडीतुन फरार झालेला आरोपी अनादी सरकार शोध घेवुनही तो मिळून येत नव्हता. मात्र आरोपी हा देशबंधुग्राम येथील आपल्या राहते घरी आला आहे अशी गोपनीय माहिती ३ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांना मिळाली असता पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पोनि. महेश विधाते यांचे नेतृत्वात पोउपनि संदिप साखरे, पोलीस हवालदार चरनदास कुकडकार, पोहवा विष्णू चव्हान, पोशि संतोष दहेलकर, पोशि बाळू केकान, पोशि सचिन मंथनवार मपोशि जयश्री आव्हाड, मपोशि शोभा गोदारी यांनी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी देशबंधूग्राम येथील अरोपीच्या घरी सापळा रचुन आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालय चामोर्शी येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #mulchera)