गडचिरोलीत नक्षल्यांचा घातपाताचा कट उधळला ; चकमकीत ५ नक्षली ठार, दोन जवान जखमी

4598

– जखमी जवानांना एरलीफ्ट करत रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला तर दुसरीकडे छत्तीसगडमधील कांकेर आणि नारायणपूरजवळील महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ नक्षलल्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले असून तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर नक्षल्यांनी काही आयईडी पेरल्या असल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करण्याकरिता गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले असता शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.
सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे

महाराष्ट्र सीमेवर पोलीस नक्षल चकमक

छत्तीसगडमधील कांकेर आणि नारायणपूरजवळील महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ नक्षल्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून सर्व मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अनेक नक्षली जखमी झाले असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या चकमकीत दोन जवान जखमी झाले असून त्यांना रायपूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.
नारायणपूर आणि कांकेरला लागून असलेल्या उत्तर अबुझमाडमध्ये नक्षल संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य असलेल्या अभय व इतर नक्षल्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली असता बस्तरच्या जवळपास सर्व जिल्ह्यांतील DRG जवान आणि महाराष्ट्रातील C-60 कमांडोंनी अभयला घेरण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली. दरम्यान डीआरजी, एसटीएफ, बीएसएफचे एक संयुक्त पथक रवाना करण्यात आले असता शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चकमक उडाली. सुमारे ३ तासांपासून चाललेल्या या चकमकीत ५ नक्षली ठार झाले. तर काही नक्षली जखमी असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत असून पोलीस दल परत आल्यावरच अधिकची माहिती प्राप्त होणार आहे.

https://x.com/ani_digital/status/1857715546306814094?t=woZtlxVJIMx4CLjABx56KQ&s=19

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kanker #cgpolice #cgnews #naxal #encounter #gadchirolilocalnews #bhamragad )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here