गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ७५.२६ टक्के मतदान

418

– ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी ७५.२६ टक्के मतदान झाले आहे.
त्यात आरमोरी विधानसभा मतदार संघात ७६.९७ टक्के, गडचिरोली ७४.९२ टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात ७३.८९ टक्के मतदान झाले.
गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात सकाळी ०७.०० ते दुपारी ०३.०० वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. काल २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंतची मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली होती. मात्र जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आकडेवारी प्राप्त होणे बाकी होते. आज २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली असून ७५.२६ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्हा मतदानाच्या बाबतीत राज्यातून अव्वल असून सदर टक्केवारी बघता राज्यातील इतर जिल्ह्यांची टक्केवारी ही कमी आहे.

बूथ निहाय आकडेवारी गडचिरोली जिल्हा क्लिक करा

मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

आरमोरी मतदारसंघात १ लाख ३१ हजार ६० पुरुष मतदार, १ लाख ३१ हजार ७१० महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ६२ हजार ७७१ मतदार होते त्यापैकी १ लाख २ हजार ७२० पुरुष, ९९ हजार ५४६ महिला व १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख २ हजार २६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण १ लक्ष ५४ हजार ६१० पुरुष मतदार , १ लाख ५२ हजार ६१० महिला व ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार होते. यातील १ लाख १६ हजार ७०४ पुरुष मतदार, १ लाख १३ हजार ४६९ स्त्री मतदार तर १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ३० हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लक्ष २५ हजार ४८१ पुरुष मतदार , १ लाख २४ हजार ९७४ महिला व ६ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ५१ हजार ४६१ मतदार होते. यातील ९५ हजार ५११ पुरुष मतदार, ९० हजार २८१ महिला मतदार तर ३ तृतीयपंथी असे एकूण १ लाख ८५ हजार ७९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यात एकूण ४ लाख १२ हजार १५१ पुरुष मतदार, ४ लाख ९ हजार २९४ महिला आणि १० तृतीयपंथी असे एकूण ८ लाख २१ हजार ४५५ मतदार होते. त्यापैकी ३ लाख १४ हजार ९३५ पुरुष, ३ लाख ३ हजार २९६ महिला व ५ तृतीयपंथी असे एकूण ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #election2024 #vidhansabhaelection )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here