The गडविश्व
ता. प्रा / दिवाकर भोयर, दि. ०३ : तालुक्यातील पन्नेमारा ग्रामपंचायत अंतर्गत मुरुमगाव,रिङवाही येथिल शेतकरी मक्याची शेती करतात. मक्का पिकाला पाणी देण्यासाठी अवैधरित्या विद्युततार मेन लाईन ला जोडून विद्युत प्रवाह सुरू करुन शेतीला पाणी देण्याचे काम चालू असुनही याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी केल्या जात आहे. तरी विद्युत वितरण उपकेंद्र मुरुमगावने याकडे लक्ष देवून वेळीच कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुरुमगाव विद्युत वितरण उपकेंद्र यांच्या दुर्लक्षीतपणामुळे एखाद्या व्यक्तिच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. विद्युत वितरण कंपनी उपकेंद्र कार्यालय मुरुमगाव येथील कनिष्ठ अभियंता यांना यांची माहिती असुन सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी करतांना दिसतात. मुरुमगाव परिसरात पाण्याची मोठी समस्या आहे. रब्बी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी पाण्याची गरज असते. हिच समस्या मिटविण्यासाठी लोक अवैध रितिने विद्युत तार टाकून लाईन सप्लाय बहुतेक ठिकाणी घेतल्या जाते. याचा भुर्दंड मात्र ईतर लोकांना भोगावे लागतात. म्हणुनच वेळीच कारवाई होने गरजेचे आहे.