अचानक घर हादरायला लागलं… गडचिरोलीत जाणवले भूकंपाचे धक्के

1486

– तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू, ५.३ रिष्टर स्केलवर तिव्रतेची नोंद
The गडविश्व
गडचिरोली दि. ०४ : सकाळच्या सुमारास अचानक घर हादरायला लागलं आणि पाहता पाहता आजूबाजूच्या घरातूनही आवाज यायला लागला घर हादरत आहे आणि परिसरात भूंकपाचे धक्के जाणवल्याची चर्चा सुरु झालेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आज ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व छत्तीसगड राज्यातीलही जिल्ह्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवाला क्षण

– झोपून असताना अचानक अंथरून हादरायला लागलं, काही कळलेच नाही, तसचं घरातून बाहेर निघताच इतरांनीही घर हादरल्याचे सांगितले.
– घरात असलेल्या वस्तू अचानकपणे आपोआप हलायला लागल्यात, घरातील फिशपॉट मध्ये कंपन पावल्यासारखे जाणवले, लगेच बाहेर निघालो असता आजूबाजूच्यांनीही अशीच परिस्थिती सांगितली आणि परिसरात भुंकपाचे धक्के जाणवल्याची चर्चा सुरु झाली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #earthquakegadchiroli #chandrapur #gadchirolinews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here