खळबळजनक : दोन माजी सरपंचांची नक्षल्यांनी केली हत्या

2901
File Photo

– अपहरण करून हत्या, नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रके टाकून हत्येची घेतली जबाबदारी
The गडविश्व
बीजापूर , दि. ०५ : नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत अहिंसक कृती करण्यास सुरुवात केल्याचे छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात दिसून येत आहे. नक्षल्यांनी दोन सरपंचांचे अपहरण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सादर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक दहशतीत आहे. सुखराम अवलम ( सरपंच – कादर ) आणि सुकालू फरसा (माजी सरपंच – बिर्याभूमी) असे नक्षल्यांनी हत्या केल्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कादरचे सरपंच सुखराम अवलम यांचे नक्षल्यांनी चिकन मार्केटमधून अपहरण केले होते. तर माजी सरपंच सुकालू फरसा हे आपल्या भाचीच्या अंत्यसंस्कारातून परतत असताना ३ डिसेंबर रोजी आडवाराजवळ पत्नीसमोरच त्याचे नक्षल्यांनी अपहरण केले. बुधवारी रात्री दोन्ही माजी सरपंचांची हत्या नक्षल्यांनी केली.
नक्षल्यांनी बिर्याभूमीचे माजी सरपंच सुकालू फरसा यांचे अपहरण केल्यानंतर सुकालू च्या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांची सुटका करण्याचे आवाहन नक्षल्यांना केले होते मात्र नक्षल्यांनी त्याला सोडले नाही अशी माहिती आहे. या दोघांची हत्या केल्यानंतर नक्षल्यांनी त्यांचे मृतदेह नामेद आणि भैरमगड पोलीस स्टेशन परिसरात फेकून दिले. सुखरामचा मृतदेह कादरजवळ तर सुकलूचा मृतदेह भुरियाभूमी-आडवाडा रस्त्यावर फेकून देण्यात आला. दरम्यान घटनास्थळावर एक पत्रक आढळलेले त्यात नक्षल्यांच्या गांगलूर एरिया कमिटीने घटनास्थळी पत्रके टाकून हत्येची जबाबदारी घेतली आहे. तर नक्षल्यांनी पत्रकातून भाजप पक्ष सोडून द्यावा अन्यथा मृत्युदंड मिळेल असा इशाराही दिला आहे. सदर घटनेने परिसरात दहशत पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here