तो पुन्हा आला… गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

3472

– महिला होती गर्भवती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्हा मुख्यालपालगत घनदाट जंगल असून या जंगलात वाघाचा वावर आहे. मागील वर्षी परिसरात वाघाने धुमाकूळ माजवत अनेक मनुष्य बळी घेतला. त्यातून सुटका होत नाही तोवर आता पुन्हा जिल्हा मुख्यालयापसून १५ अंतरावर आलेल्या चातगाव बीटमध्ये वाघाने हल्ला करून महिलेस ठार केल्याची घटना आज ०६ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सदर महीली ही गर्भवती असल्याचे. कळते. या घटनेने पुन्हा एकदा परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीत आहेत. शारदा महेश मानकर (वय २५) रा. रा. कुरखेडा (चातगाव) असे मृतक महीलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शारदा मानकर ही चातगाव बिटातील जंगलाला लागून असलेल्या शेतामध्ये नेहमीप्रमाणे कामे करण्यासाठी गेली होती. दरम्यान परिसरात वाघाचा वावर असून शेतात काम करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने शारदा वर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. घटनेची माहीती वनविभागाला कळताच वनकर्मचारी घटनस्थळी दाखल होता पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक महिलेस एक चिमुकला असून तिच्या अशा मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान सदर घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. मृतक महिलेच्या कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीसुद्धा केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchiroliforest #tigerattack #wiledtiger #chatgao)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here