मुरूमगाव येथे एअरटेल टॉवरचे अनाधिकृत बांधकाम

699

– दखणे विद्यालया तर्फे ग्रामपंचायत ला निवेदन
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.,०८ : तालुक्यातील मुरूमगाव येथे ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र न घेता शाळेच्या १०० मी अंतराच्या आतील परिसरात एअरटेल टॉवरचे अनाधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याबाबत दखणे विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ग्रामपंचायत ला निवेदन सादर केले आहे.
शाळेच्या मुख्य दारा च्या अगदी समोर एअरटेलचे टॉवर बांधकाम होत असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यत अडथळा निर्माण होणार असून, टॉवर च्या अतिक्रियशिल प्रारणा मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची भीती पालकांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेसमोर होणाऱ्या टावरचे बांधकाम थांबवण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांवर होणारे भविष्यातील दुष्परिणाम टाळण्यासाठी त्या टावरचे बांधकाम इतरत्र करण्यासंबंधी उचित कार्यवाही करण्यात यावे याबाबत मुख्याध्यापक मार्फत ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांना निवेदन देण्यात आले आहे.
सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी टॉवर उभारण्याबाबत कंपनी ला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही त्यामुळे सदरच्या टॉवर निर्मितीचे काम अनाधिकृत असल्याचे स्पष्ट केले. सदर टॉवर च्या अनाधिकृत उभारणी बाबत ग्रामपंचायत काय निर्णय घेणार यांकडे पालकांचे लक्ष वेधले आहे.
यापूर्वी वादळ वाऱ्यामुळे कुरखेडा येथील बिएसएनएल चे टॉवर बाजार चौकात कोसळले होते. सदर टॉवर शाळेच्या १०० मीटर आतील परिसरात
निर्माण होत असलेल्या टॉवर बाबत भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवित हानी चा प्रश्न सुद्धा संस्था अध्यक्ष के. आर. दखणे आदीवासी विकास शिक्षण संस्था मुरुमगाव तर्फे निवेदनातून व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here