The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : सावरगाव -मुरुमगाव – गडचिरोली मार्गाने नियमीत चालणाऱ्या मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचविणाऱ्या बस च्या डिझेल टाकीला गळती झाल्यामुळे बस मुरुमगाव बसस्थानकातच अडकली ,आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा खोळंबा झाला..
सावरगाव -मुरुमगाव-ते धानोरा बस क्रमांक एमएच ४० एक्यू ६१२३ आज ११ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता गडचिरोली वरून मुरुमगावला आली, तिथून परत करते वेळी बसची डिझेल टाकीला गळती सुरू झाल्यामुळे बसचा पुढचा प्रवास थांबविला त्यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचू शकले नाही. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेस मुकावे लागले, शिक्षणापासून वंचित रहावे लागले. सोबतच बसमधील इतर प्रवाशी सुद्धा खोळंबले.
शासनाने विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशन घ्या बस उपलब्ध करून दिल्या तरी या मार्गावर एस. टी.महामंडळाच्या भंगार बस नेहमीच येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बस अभावी शाळेला दांडी मारावे लागते. त्यामुळे शैक्षनिक नुकसान होत आहे. यासाठी महामंडळाने चांगल्या दर्जाच्या बसेस सदर मार्गा वर उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि मुरुम गाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.