– तृतिय क्रमांक पटकावत जिल्ह्याची मान उंचावली
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २४ : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुणे येथील स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करित राज्यात तृतिय क्रमांक पटकावल्याने गडचिरोली जिल्ह्याने पुन्हा एकदा डंका वाजत जिल्ह्यात मानाचा तुरा रोवल्याने विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रम २०२४-२५ अन्वये इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता या विषयावर नक्षलग्रस्त आदिवासी गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करीत विभाग स्तरावर भूमिका अभिनय स्पर्धा पार पडली. त्यात धानोरा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्य स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन राज्यात तृतिय क्रमांक पटकावला. अशा पद्धतीने राज्यस्तरावर तिसरे स्थान पटकाविनारी जिल्हातिल पहिलीच शाळा आहे. आपल्या अभिनयाची छाप राज्यस्तरावर पोहचविली आणि जिल्ह्याची शान उंचावली. त्यामुळे निश्चितच अभिनंदन पात्र आहेत. राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व दिशेला असलेल्या धानोरा तालुक्याची अतिदुर्गम अशी आहे मिटविली. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर, नागपूर येथे विभागीय स्पर्धा संपन्न झाली. या विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये ऐकून सहा जिल्ह्यातील चमूने भाग घेतला होता. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करीत जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील विद्यार्थानि विभाग स्तरावर गडचिरोली जिल्हाने प्रथम क्रमांक पटकाविला होता. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करित संपूर्ण राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले.
सदर स्पर्धेमध्ये कुमार नुमान खलील शेख, कुमार करण किशोर बसु, कुमार विपश्य रितेश मशाखेत्री, कुमारी नंदिनी नरेश उसेंडी, कुमारी साक्षी कालिदास पदा, या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. कुमारी रजनी मडावी आणि भालेराव शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरावर तिसऱ्या क्रमांक मिळविलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा चमुचे शिक्षणाधिकारी पवार, प्राचार्य बी.जी. चौरे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले, डॉ. विनीत मते, विभाग प्रमुख अधिव्याख्याता राठोड, गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेणूताई म्हशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, मुख्याध्यापक सुरजुसे, विषय अध्यापक दुगा मॅडम, शर्मिष्ठा धाईत, पोर्णिमा मडावी साधन व्यक्ती, प्रशांत व्ही. साळवे शिक्षक, डॉ. रश्मी डोके, तोटावार, कोलटकर शिक्षक, तथा सर्व कर्मचारी व तालुक्यातील लोकांनी अभिनंदन केले आहे.