– आंजनटोला येथे तालुकास्तरीय क्रीडा सम्मेलनाचे उदघाटन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : जिवनात शिक्षणा सोबतच खेळाचे सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे. परिपूर्ण व्यत्तिमत्व विकासाकरीता मैदानी खेळाना महत्व द्या, शाळेत होणाऱ्या खेळामूळे सांघिक व एकात्मतेची भावना वृद्धिगत होत यश-अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होते असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन सोमवार रोजी आंजनटोला येथे करण्यात आले यावेळी उदघाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी धिरज पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम, माजी उपसभापती श्रीराम दूगा, जि.प. सदस्य प्रभाकर तूलावी, गिता कूमरे,अशोक इंदूरकर, माजी पं.स सदस्य धरमदास उईके, गट शिक्षण अधिकारी रविन्द्र शिवणकर, वडेगांव सरपंच नगिना कसौंदी, उपसरपंच भाग्यवान जनबंधू, माजी सरपंच संजय कोरेटी, पोलीस पाटील कूंडलिक नैताम, शाळा समीती अध्यक्ष जगदीश मेश्राम, तंठा मूक्त समीतीचे अध्यक्ष यशवंत सूकारे, रामाधर खडाधार केंद्र प्रमूख संजय मेश्राम, प्रभारी केंद्र प्रमूख तथा मूख्याध्यापक गुलाब सोनकूकरा, उमाजी धूर्वे, अगरसिगं खडाधार आदि उपस्थित होते. तिन दिवसीय या क्रिडा संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजयी संघाना पूरस्कृत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी अनिल मूलकलवार, संचालन शिक्षिका दिपाली कन्नाके तर आभार शिक्षक सूरेश शेंडे यांनी केले. यशस्वीतेकरीता पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र प्रमूख जि.प.शाळेतील सर्व मूख्याध्यापक, शिक्षक यांनी सहकार्य केले.