गडचिरोली : नऊ महिन्यातच जिल्हाधिकारी दैने यांची बदली, आता नवे जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा

580

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ११ मार्च रोजी अचानक बदलीचे आदेश निघून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय दैने यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर आज २४ डिसेंबर रोजी २०२४ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पात्र जारी करत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर येथे नियुक्ती केली असून त्यांच्या जागी आता अविश्यांत पांडा आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविश्यांत पांडा हे आता गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
जिल्हाधिकारी संजय मीना यांच्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे संजय दैने यांच्या हाती आल्यानंतर लोकसभा निवडणूक व त्यानंतर विधानसभा निवडणुक प्रक्रियेचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी ते आव्हान स्वीकारत लोकसभा निवडणूक शांततेत आणि जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी पार पाडण्याचा विक्रम तयार केला, तसेच त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा मान त्यांच्याच वाट्याला आला. एकूणच जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दैने यांच्यापुढे निवडणुकांचे मोठे आव्हान असतानाही त्यांनी चोखपणे पार पाडले. आता त्यांच्या जागेवर अविश्यांत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यापुढेही निवडणुका, जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न तसेच प्रशासकीय कामाचा मोठा व्याप असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here