भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन

657

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन
– वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
The गडविश्व
नवी दिल्ली, दि. २६ : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे आज २६ डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. मनमोहन सिंह यांना श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. १९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. २००४ साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठले त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर २००९ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
सन १९९६ साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. २००४ साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ.मनमोहन सिंह यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल २०२४ साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dr manmohan singh #gadchirolinews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here