बेलगाव मुरूमगाव येथे एकता तथा शक्ती दिवस साजरा

51

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २८ : तालुक्यातील मुरूमगाव ग्रामपंचायत अंतर्गत बेलगाव येथे आदिवासी हलबा व हलबी समाज संघटना गडचिरोली व आदिवासी हलबा समाज कर्मचारी महासंघ गडचिरोलीच्या वतीने एकता व शक्ती दिवस साजरा करण्यात आले.
यामध्ये सर्वप्रथम हनुमान मंदिर येथून महिलांनी कलस डोक्यावर घेऊन गावातून रॅली काढण्यात आली, मा दंतेश्वरी गेंदसिंग नायक व बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले तसेच हलबा / हलबी आदिवासी समाजाचे ध्वजारोहण जयलाल मार्गिया न्याय समिती अध्यक्ष मुरूमगाव यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनिराम रावटे जिल्हाध्यक्ष आदिवासी हलबा हलबी समाज संघटना गडचिरोली, उद्घाटक म्हणून माधवराव गावड कार्याध्यक्ष आदिवासी हलबा हलबी संघटना कर्मचारी महासंघ नागपूर, सत्कारमूर्ती खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रमुख अतिथी म्हणून मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, लालाजी उसेंडी माजी अध्यक्ष शिक्षक संघटना धानोरा, अजमन रावटे माजी सभापती पंचायत समिती धानोरा, लताताई पुंगाटे माजी जिल्हा परिषद सदस्य, मदन बढई उपाध्यक्ष छत्तीसगड केंद्रीय महासभा, पद्माकर मानकर सल्लागार हलबा संघटना गडचिरोली, मनोहर चांवरे मुख्याध्यापक, शिवप्रसाद गवर्णा सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव, शेवंता हलामी सरपंचा ग्रामपंचायत पनेमारा, भूपेंद्रशहा मडावी, डॉ. राहुल मार्गीया, सरोज अलनिया आयकर विभाग मुंबई ,डॉ. सर्वेसर कोमा पशु वैद्यकीय अधिकारी, अरुण सातपुते केंद्रप्रमुख, जगनसाय तुलावी मुख्याध्यापक कोसमघाट, बैसाकूराम कोटपरिया, संतोष मलिया पोलीस पाटील बेलगाव ,चंद्रशेखर वरमडिया पोलीस पाटील मुरूमगाव, श्रीराम राऊत सर्कल अध्यक्ष कुलभट्टी, दादाजी प्रधान अध्यक्ष सोनसरी, यशवंत संचालक कृषी बाजार समिती वडसा, मथुराम मलिया उपसरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव, प्रभाकर हलामी पोलीस पाटील पन्नेमारा कृपाराम भूरकुरिया, कचरू राम पटेल कुलभट्टी बोधीराम भैसाराम बेलगाव, लालाजी रामटेके मुरूमगाव, जांभुळकर, बुधराम ताराम, रामलाल मारगिया,चावन शहा मडावी महाराज, निरंग शहा मडावी महाराज, श्रीमती दमयंती ताई चवरीकर महिला संघटक मालदुगी महारसिंग फर्दीया सर्कल अध्यक्ष मुरूमगाव, लोकचंद बालापुरे व न्यानेश्वर राणे सहसचिव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सुरेश नाईक कोषाध्यक्ष हलबा समाज संघटना गडचिरोली यांनी म्हटले को २६ डिसेंबर हा दिवस खासदार डॉ. नामदेव किरसान व कोठवार गुरुजी यांच्या प्रयत्नामुळे तीनही विभागातील विखुरलेल्या हलबा हलबी समाजाला एकत्रित केल्यामुळे हा दिवस आपण साजरा करतो आहोत आणि समाज बांधवांनी एकत्रित येऊन समाजातील अडचणी सोडविण्याची प्रयत्न करावे असे सांगितले. दरम्यान या कार्यक्रमात समाज जीवन गौरव पुरस्कार मुरलीधर बापू प्रधान माजी अध्यक्ष क्षेत्रीय शाखा सोनसरी यांना प्रधान करण्यात आले. सत्कारमूर्ती खासदार डॉ. नामदेव किरण खासदार यांनी हलबा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले आहे तसेच समाजाने तीनही विभागातील विखुरलेल्या हलबा हलबी समाजाने एकत्रित केल्यामुळे हा दिवस आपण साजरा करतो तसेच पेसा कायदा हा आदिवासी समाजासाठी आहे जर आदिवासींच्या हक्कावर अन्याय होत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे तसेच आपल्या समाजात दुजाभाव न करता रोटी, बेटी व्यवहार करणे गरजेचे आहे असे सांगितले. अनेक मान्यवरांनी आदिवासींच्या समस्या काय आहेत याची जाणीव करून समाजातील आपल्या लेकरांना शिक्षण देऊन संघटित केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये अनेक रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील हलबा हलबी समाजातील आदिवासी बांधवांनी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे संचालन सरादू चीराम सचिव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रमेश भैसारा, नेगुराम कोठवार, अमरू बढई, अमरलाल औरसा, अहिल्याबाई रावते, खेलनबाई चिराम, मंगल सिंग देहारी, शंकर मार्गिया सर, अहेल सिंग मालिया, सोनसिंग घनगुण, ड्राफ्टिंग चिराम,दयाराम कवलिया, जयंत भुरकुरीया, अशोक बढई, शत्रु मलिया महेश घनगुण नेवचंद समरत, प्रदीप कोठवार, महेंद्र लेडिया नकुल भोयर जीवन गव्हर्ना, गौतम राणा मुकेश कोलियारा, फिरोज कुमार कोमा, रुपेंद्र नाईक व समस्त समाज बांधवांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here