फुलबोडीत शेतकऱ्याचे धानाचे पुंजणे जळून खाक

88

– नुकसानग्रस्त भरपाई ची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३० : शेतात ठेवलेल्या धान पुंजण्याला अज्ञात व्यक्तींनी आग – लावल्याने धान पुंजणे पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी धानोरा तालुक्याच्या फुलबोडी शेतशिवारात उघडकीस आली. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, उपासमारीची वेळ आली आहे.
धानोरा तालुक्यातील फुलबोडी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील धान पिकाची कापणी व बांधणी करून पुंजणे तयार केले होते. सध्या मळणी अंतिम टप्प्यात असून, सदर शेतकरी काही दिवसात मळणी करण्याच्या तयारीत होता. मात्र, अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याच्या धान पुंजण्याला आग लावल्याने पुंजणे पूर्णतः जळून खाक झाले. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात धान पुंजण्याला आगी लावण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. विशेष म्हणजे, धान पुंजणे जळाल्यानंतर सदर शेतकऱ्याला कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. शासनाने धान पुंजणे जळाल्यानंतर शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here