गडचिरोली : १० लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलींचे आत्मसमर्पण

608

– विविध गुन्ह्यात होता सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर १० लाखांचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलींनी ८ जानेवारी २०२५ रोजी आत्मसमर्पण केले. शामला झुरु पुडो ऊर्फ लीला, कंपनी क्र. १० पीपीसिएम/सेक्शन कमांडर, (वय ३६), रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी, भामरागड दलम सदस्य, (वय २४), रा. नेलगुंडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलींचे नाव आहे.
शासनाने २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६९३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
शामला झुरु पुडो ऊर्फ लीला ही २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. २००२ मध्ये चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती, त्यानंतर प्लाटुन क्र. ०३ मध्ये बदली होऊन २००७ पर्यंत काम केले. पुढे कंपनी क्र.०४ मध्ये बदली होऊन २००८ पर्यंत काम केले. २००८ मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. ०४ मध्ये २०१० पर्यंत काम केले व २०१० मध्ये कंपनी क्र.१०मध्ये बदली होऊन सेक्शन कमांडर या पदावर राहुन आजपावेतो काम केले. तिच्यावर आजपर्यंत एकुण ४५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २१ चकमक, ०६ जाळपोळ, व १८-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हि जानेवारी २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत होती तिच्यावर आजपर्यंत एकुण ०८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०४ – चकमक, ०१- जाळपोळ, व ०३- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिचेवर ०८ लाख तर काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिला एकुण ५.५ लाख रुपये तर काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते आतापर्यंत एकुण ४६ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २०२५ च्या पहिल्याच आठवड्यात १३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये ०१ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंंत्री यांचे समोर ११ वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांचाही समावेश होता. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व जसवीर सिंग, कमांण्डट ११३ बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here