आता वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक

496

The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्याकरिता मे. रियल मेझोन इंडिया लि. हि एजेन्सी निश्चित करण्यात आलेली असुन एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकिंग पोर्टल http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. वाहन धारकांनी त्वरीत पोर्टल बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहन धारक गडचिरोली जिल्ह्यातील नसला तरी काही कामा निमीत्त गडचिरोली जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. सदर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता पूढील प्रमाणे शुल्क जीएसटी वगळूनआकारण्यात येणार आहे.

वाहनाचा प्रकार

दुचाकी/ट्रॅक्टर शुल्क –  450
तीन चाकी शुल्क – 500
इतर सर्व वाहने शुल्क – 745

वाहन धारकांना त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापूरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे तक्रार दाखल करु शकतात. सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. सबब वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे व तिसऱ्या नोंदणी चिन्हाचे स्टीकर लावण्याकरिता एचएसआरपी पोर्टलवर ३१ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त योजना चढविणे/उतरविणे/दुय्यम प्रत/विमा अद्यावत करणे इत्यादि कामकाज थांबविण्यात येईल तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सुचना प्राप्त झाल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here