नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम

65

– माजी खा. अशोकजनेते यांचे प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १५ : नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून समाजाला उद्बोधन मिळावे आणि सकारात्मक बदल घडावा, यासाठी नाटकाचा प्रभावी उपयोग व्हावा असे प्रतिपादन माजी खासदार अशोक नेते यांनी मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर रांगी (जमिनदारी) येथे आदर्श नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने आणि कला दर्पण नाट्य रंगभूमी, वडसा यांच्या सादरीकरणातून संगीत जिवलगा घायाळ मी! या नाटकाचा उद्घाटन सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांना केले.
यावेळी मा.खा. अशोक नेते यांनी नाटकाच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. या नाटकाचे कौतुक करत समाजाला दिशा दाखवण्यासाठी नाटकाचा उपयोग केला पाहिजे. अशा कलाकृतींमुळे अधिक प्रगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत मकर संक्रातीच्या सर्व समस्त जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी, रांगी गावातील दिवंगत नाट्यकलावंत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करत उपस्थित मान्यवर आणि रसिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
रसिक आणि मान्यवरांनी एकत्रितपणे या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होत दिवंगत आत्म्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नाटय सभागृहात भावनिक वातावरण तयार झाले होते.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेट्टी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, कृ.उ.बा.स. सभापती शशिकांत साळवे, उपसभापती लाकडे, सरपंचा गेडाम, वनक्षेत्र सहाय्यक रामगुंडावार, सय्यद, अंतू साळवे, सुहास अंबादे, भुषण काटेंगे, साजन गुंडावार, शहराध्यक्ष सारंग साळवे, बनपुरकर, जयंत महाराज काटेंगे, रामरतन गोवहणे, नितीन हेमके, पांडुरंग समर्थ, संजय कुंडू, प्रल्हाद भाऊ म्हशाखेत्री, जीवन ठाकरे, दिवाकर भोयर, जगदीश कन्नाके यांसह परिसरातील अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते.
या नाटक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांवरून आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक नितीन गावडे यांनी प्रास्ताविक शशिकांत साळवे तर आभार नरेंद्र भुरसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here