The गडविश्व
ता. प्र / धानोरा , दि. १५ : दि.गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑप. बँक आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सँलरी पँकेज सुविधा देणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील को-आँपरेटिव्ह बँकेतुन अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहेत. परंतु सेवानिवृत्त वेतन धारकांना सेवा शुल्कात सवलत मिळत नव्हते म्हणुन बँकेच्या संचालक मंडळाकडे सुविधा मिळण्याबाबत मागणी करण्यात आली होती. बँकेच्या संचालक मंडळाची सभा ३० नोव्हेंबर २०२४ पार पडली असता त्यात ठराव क्र. १२ नुसार बँकेत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचारी तसेच जिल्हा परिषद व त्यांचे अधिनिस्त कार्यालयातील सेवानिवृत्त वेतन धारकांना सेवा शुल्कात एस.एम.एस. सुविधा निशुल्क, ए .टी. एम.चे वार्षिक देखभाल शुल्क, मोफत ए.टी.एम. कार्ड व मोफत नुतनिकरण,
प्रत्येक ए.डी.एम. व्यवहाराची मर्यादा ५ वरुन ७ करण्यात आली आहे,
निशुल्क धनादेश सुविधा, आरटीजीएस/एन.ई.एफ.टी. व्यवहार निशुल्क,मोबाईल बँकीग/आय.एम.पी.एस. व्यवहार निशुल्क, लॉकर भाडयामध्ये ५० टक्के सवलत, यु.पी.आय. भिम ॲप सुविधा निशुल्क या सर्वच सुविधा १ जानेवारी २०२५ पासुन लागु करण्यात येत आहे. तरी आपल्या सेवानिवृत्त वेतन धारक कर्मचाऱ्यांना माहिती देवून निवृत्ती वेतन प्राप्त बँकेच्या शाखेत जावुन “सेवानिवृत्ती सॅलरी पॅकेज” फॉर्म भरुन सेवेचा लाभ घेण्याबाबत कळविले आहे.