– एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यातील देसाईगंज शहरातील वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याची कारवाई देसाईगंज पोलिसांनी केली असून याप्रकरणी आरोपी तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार (वय २२), रा. हनुमान वार्ड देसाईगंज जि. गडचिरोली यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याकडील चोरी केलेल्या दोन वाहने किंमत १ लाख २५ हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्यात वाहन चोरीबाबत गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता मात्र आरोपीचा शोध कुठेही लागला नाही. आरोपीचा शोध घेतांना १८ जानेवारी २०२५ रोजी देसाईगंज पोलिसांना आरोपी हा आपल्या राहत्या घरी दोन चोरीचे दुचाकी वाहन लपवून ठेवलेले आहेत व ते वाहन कोणाला तरी विकण्याच्या तयारीत आहे अश्या गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रात्रो १०.३० वा. सपोनि. संदीप आगरकर हे पोलीस पथकासह सदर ठिकाणी रवाना झाले. नमुद गुन्हयात ताब्यात घेऊन विचारपूस केले असता आरोपीने उडवा-उडवीची उत्तरे दिली. आरोपीकडे वाहनाच्या कागदपत्राबाबत सखोल चौकशी केली असता त्याबाबत त्याने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यानंतर पोस्टे येथील अभिलेख तपासले असता सदर वाहन दोन्ही वाहन हे चोरी केलेले असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीच्या ताब्यातील दोन्ही दुचाकी वाहन अंदाजे किंमत १ लाख २५ हजार असा मुद्देमाल जप्त करुन नमुद गुन्ह्रात त्याला अटक करुन प्रथम श्रेणी न्यायालय देसाईगंज यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधीक तपासात सदर आरोपी हा पोलीस ठाणे ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील एका खुनाच्या गुन्हयातील रेकॉर्ड वरील आरोपी असल्याचे उघडकीस आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील पो.नि. अजय जगताप, यांच्या नेतृत्वात सपोनि. संदीप आगरकर, सपोनि. मनीष गोडबोले, पोअं/विलास बालमवार, पोअं/नितेश कढव, पोअं/सतीश बैलमारे पोअं/रोशन गरमडे यांनी पार पाडली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #desaiganj )