The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला.
कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या अभियानामुळे मुलींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळाल्याचे सांगितले. त्यांनी पीसीपीएनडीटी अंतर्गत कडक धोरण राबवून स्त्री भ्रुण हत्या रोखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
जिल्हा नियोजन अधिकारी ल पाचखेडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मुला-मुलींचे संतुलित गुणोत्तर समाधानकारक असल्याचे सांगत, स्त्री शिक्षण व सन्मान यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी या महिनाभर चालणाऱ्या अभियानाची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात बाल कल्याण समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे महिलांसाठी हेल्पलाईन 181 आणि मुलींसाठी 1098 यासारख्या सेवांचा प्रचार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला संजीवनी विद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र भैसारे, शिक्षक, व मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. अभियानाद्वारे स्त्री-पुरुष समानता, शिक्षण आणि स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन जयंत जथाडे यांनी केले, तर आभार कवेश्वर लेनगुरे यांनी मानले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, राज्यकर अधिकारी रविंद्र मिसाळ, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, बाल कल्याण समिती सदस्य काशिनाथ देवगडे व दिनेश बोरकुटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) श्रीमती ज्योती कडू, विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, प्राचार्य जितेंद्र भैसारे, शिक्षक राकेश यामावार, हर्षाली ढोणे, आकाश सुर्वे व व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.