कुरखेडा : सती नदी पात्रात आढळला युवकाचा मृतदेह

1987

– हत्या झाल्याचा संशय
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि.२५ : तालुक्यातील सती नदी पात्रात २१ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवार २५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रोहित राजेंदर तुलावी (वय २१) वर्ष रा. उपरिकर टोली ता. कुरखेडा जि. गडचिरोली अशी मृताची ओळख पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना सती नदी पात्रात एक युवक पडून असल्याचे दिसून आले. नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता त्याची कुठलीही हालचाल दिसून आली नाही. याबाबत नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून युवकाला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी युवकाची तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात मोठे गर्दी पहावयास मिळाली होती. सदर युवक हा ग्रामपंचायत गोठनगाव अंतर्गत येणाऱ्या उपरीकर टोली येथील रहिवासी असून तो बी. ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता अशी माहिती आहे. नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून युवकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #kurkheda #kumbhitola #sati river #kurkhedapolice #gadchirolilocalnews #chetangahane #kurkhedanews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here