– अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : तालुक्यातील निमगाव ते मिचगाव मार्गावर मागील सहा महिन्यांपासून विद्युत खांब रस्त्यावर पडून आहेत. याकडे येथील कंत्राटदाराने टाकलेले पोल उभे केलेच नाही. तरी सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
चातगाव विद्युत विभागाअंतर्गत येणाऱ्या निमगाव येथुन मिचगाव गावाला विद्युत पुरवठा करण्यासाठी खांब रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आले खरे परंतु ते सहा महिन्यांपासून पडले असल्याने पोलला जंग चढलेला आहे. ६ ते ७ किमी अंतर असुन याचे कंत्राट खाजगी व्यक्तीला असावे म्हणुनच रस्त्यावर जागोजागी लोखंडी खांब टाकून ठेवले. हे खांब कधी उभे केले जातील, यावर विद्युत वायरिंग कधी केली जाईल असा प्रश्न परिसरातील लोक विचारत आहेत.
संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिक करीत असून संबंधित विभागाने लक्ष देवून या मार्गावरील विद्युत खांबचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.