– नागरिकांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३० : स्थानिक नगर पंचायतच्या वतीने आठवडी बाजार परिसरामध्ये एकूण ४७ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आलेला. सदर गाळ्याची लीलाव प्रक्रिया सुरू आहे. हि प्रक्रिया किचकट असून यातील अटी शिथिल करा. ही निविदा लोकांपर्यंत पोहोचली नसल्याने सदर प्रक्रिया थांबवण्याची मागणी मुख्याधिकारी नगरपंचायत धानोरा यांना २९ जानेवारी ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
धानोरा नगरपंचायत हद्दीमध्ये नव्यानेच शॉपिंग कॉम्प्लेक्स फेज एक ८ गाळे, फेज दोन ८ गाळे, शॉपिंग काँम्पलेक्स पहिला मजला २१ गाळे, चवेला रोड १० गाळे असे ऐकून ४७ गाळ्याचे बांधकाम करण्यात आले आहेत. त्याचा उद्देश तत्कालीन कमेटीने गावातील स्थानिक तसेच सुशिक्षीत बेरोजगार यांना कामी येवून कमी पैशामध्ये दुकान गाळे बेरोजगाराना मिळावे त्यातुनच रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने ते दुकान गाळे बांधकाम करण्यात आले. पण सदर ई निविदा प्रक्रियामध्ये कुठल्याच प्रकारचा सामान्य मानसाला न्याय मिळेल असा मुद्दा नसुन सदर गाळे प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने व कुणालाच समजणारे नाही. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर जातिल अशा पध्दतीने केली गेली आहे. त्याच प्रमाणे सामान्य माणसापासून लपुन ठेवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामध्ये धानोरा येथे न येणाऱ्या दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहीरात देण्यात आली. त्यामुळे कुठेतरी आपल्या मर्जीतील लोकांना दुकान गाळे देण्याचा उद्देश येथे प्रामुख्याने दिसत आहे. तरी सदर निविदा प्रक्रिया रद करुन नविन निवीदा प्रक्रिया राबवावी व धानोरा येथील स्थानिक बेरोजगार व नागरिकांना न्याय मिळेल अशी मागणी धानोरा येथील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणविस, जिल्हाधिकारी गडचिरोली, आमदार डॉ. मिलींदजी नरोटे यांना देण्यात आली आहे.
निवेदन देताना बाळू उंदीरखाडे, सारंग साळवे, साजन गुडावार, राकेश रांखडे, सुभाष धाईत, महादेव गणोरकर, गणेश कुळमेथे, राकेश कुळमेथे, नरेश निमलवार, यशवंत कुंभार, रविभाऊ येलसवार, सलिम पठाण, तुफान उंदिरवाडे, जफरोज शेख, जमीर कुरेशी, मुकुल बोडगेवार, चोरोषोत्तम् चिंबाळकर, अक्षय सहारे, गोपी चौधरी, भक्तदास गडपायले, पुरुषोत्तम चिंचोलकर, अरुण हेमके, रवी कोंतकोडावार, घनशाम मडावी, विनेश गावडे, विष्णू हलदर आदी उपस्थित होते.