शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई : तीन एजंट्सला केली अटक

272

The गडविश्व
पुणे : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन एजंट्सला अटक केली आहे. कलीम गुलशेरखान, जमील पठाण, मुकुंदा सूर्यवंशी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येते. मात्र, या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात टीईटीमध्ये झालेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.
TET परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे. हे तिघेही आरोपी यापूर्वी या प्रकरणात अटक केलेल्या हरकळ बंधूंच्या संपर्कात होते. यातील कलीम आणि जमील यांचा म्हाडा पेपरफुटी प्रकरणात देखील सहभाग असल्याचं समोर आले आहे. या आरोपींकडून शिक्षक भरती तसेच म्हाडा परीक्षेला बसलेल्या 128 उमेदवारांची यादी मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यांनी हरकळ बंधूंना 60 लाख दिल्याची पोलीस तपासात कबुली दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here