The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला साप आढळून आल्यास सापाला कोणतीही इजा न पोहचवता सर्पमित्राना माहिती द्यावी असे आवाहन नेहमीच वनविभाग व सर्पमित्रांच्या वतीने करण्यात येते. शहरात सर्पमित्रांनी ७ दिवसांमध्ये तब्ब्ल ११ घोणस सापांना पकडून जंगलात सोडून जीवनदान दिल्याची माहिती आहे. या वेळी सर्पमित्र अजय कुकडकर, सौरभ सातपुते,अनुप म्हशाखेत्री, योगेश हजारे, मकसूद सय्यद उपस्थित होते.
शहरात तसेच आजूबाजूच्या गावात साप निघाल्यास सर्पमित्र नेहमीच साप पकडण्या करिता जात असतात. मात्र या वर्षी ७ दिवसा मध्ये ११ घोणस सापांना पकडण्यात आले या पैकी ४ साप हे पोटेगाव रोड वर असेल्या वन वसाहत येथे पकडण्यात आले. घोणस साप हा अत्यंत विषारी साप असून त्याला गावाकडच्या भाषेत टवऱ्या महाडोर असे म्हणतात. घोणस सापाच्या रंगामुळे तो वाळलेल्या पाला पाचोळ्यात असल्यास दिसून येत नाही. त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि अश्या ठिकाणी हात टाकू नये. सध्या घोणस सपाचा मिलनाचा काळ असल्याने हा साप जास्त प्रमाणात दिसत आहे. साप निघाल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना बोलवावे असे आवाहन सर्पमित्र अजय कुकडकर यांनी केले.