– प्रेक्षकांसाठी जाण्या – येण्यास मोफत सोय
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : शहरात प्रथमच लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) तर्फे आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धेच्या टी २० क्रिकेट सामन्यांचा थरार येत्या ५ फेब्रुवारी २०२०५ पासून गडचिरोलीकरांना अनुभवता येणार आहे. येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवि शास्त्री हे उपस्थित राहणार आहे. जवळपास १५ ते २० दिवस हे सामने चालणार आहेत अशी माहिती LMEL चे कार्यकारी संचालक एस. एस. खांडवाला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या हस्ते बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक, लॉईड्स मेटल्स यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर उद्घाटन सोहळा ५ फेब्रुवारी २०२०५ रोजी दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून यामध्ये शास्त्री यांना मुख्य अतिथी म्हणून सन्मानित करून त्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा भव्य मार्च – पास्ट होणार आहे. दरम्यान यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहे जे या संपूर्ण सोहळ्याचा मुख्य आकर्षण असणार आहे.
या स्पर्धेचा पहिला साखळी सामना संध्याकाळी ५:०० वाजता सुरू होईल, ज्यामध्ये लॉईड्स संघ खेळणार आहे तर दुसरा सामना रात्री ८:३० वाजता व ६ फेब्रुवारी पासून पुढील सर्व सामने या वेळापत्रकानुसार होणार आहेत.
दररोज दिवस आणि रात्रकालीन सामने होणार असून पहिला सामना दुपारी ४.०० – संध्याकाळी ७:००, दुसरा सामना संध्याकाळी ७:३० – रात्री १०:३० वाजतापर्यंत होणार आहे. सदर या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांचे संघ तसेच पोलीस, वन आणि महसूल विभाग व लॉईड्स मेटल्स यांचे संघ सहभागी होणार आहेत.
सामने पाहण्यास मोफत जाण्या येण्याची सोय
एम आय डी सी (MIDC) मैदानावर सामने होणार असून प्रेक्षकांना या स्पर्धेचा प्रत्यक्षात थरार अनुभवता यावा यासाठी मैदानापर्यंत जाण्यासाठी मोफत जाण्या – येण्याची सोय करण्यात आली आहे. संपुर्ण सामने हे मोफत आहेत. जाण्या मैदानावर जाण्यासाठी विशिष्ठ ठिकाणाहून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सदर संपूर्ण सामने ऑनलाईनही पाहता येणार आहेत.
मैदान परिसरात स्टॉल, दुकाने लावण्याची व्यवस्था
सदर स्पर्धेच्या परिसरात स्टॉल, दुकाने लावण्याची व्यवस्था करण्यात आली. आयोजकांकडून मोफत लाईट ची व्यवस्थाही तसेच कोणतेही कर करण्यात येणार नाही आहे. ज्यांना दुकाने, स्टॉल लावायचे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांवर पडणार प्रभाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने ११ फेब्रुवारीपासून १२ वी ची तर २१ फेब्रुवारी पासून १० वीची परीक्षा सुरू होणार आहे. गडचिरोलीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच होतात त्याप्रमाणे मैदान तयार करण्यात येत आहे, एकाचवेळी जवळपास १० हजार पेक्षक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे त्यामुळे नक्कीच गडचिरोलीतील नागरिक य स्पर्धेचा थरार अनुभवतील मात्र या स्पर्धेचा १० वी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल अशी प्रतिक्रिया पालक वर्गातून उमटताना दिसत आहेत