मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तथा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०४ : इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींना माहिती होण्यासाठी ३० जानेवारी रोजी धानोरा येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तथा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन हे मागील दोंन वर्षापासून धानोरा तालुक्यातील विविध शाळेत मुलींसोबत जीवन कौशल्य, पायाभूत भाषा व गणित या विषयावर काम करीत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुलींना त्यांचे योग्य भविष्य ठरविता आले पाहिजे. त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले पाहिजे व नवनवीन स्वप्न पाहिले पाहिजे आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची त्यांची तयारी असली पाहिजे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील शिक्षिका मंजुषा कुथे यांनी सुद्धा मुलींना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थिती दिपाली बांगरे तालुका समन्वयक मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील शिक्षिका कु.प्रितीनंदा बोदलकर, दुशिला उंदीरवाडे, लक्ष्मी कुकडकर यांचे सर्वांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा कुरेकार यांनी केले तर संचालन व आभार शाळेतील विद्यार्थिनींने मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दीप्ती वाकुळकर व पल्लवी गुरणुले यांनी सहकार्य केले. दिपाली कुळमेथे मुख्याध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.