चामोर्शी :  चितळ शिकार प्रकरणी एकास अटक

183

– १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : जंगलामध्ये विद्युत प्रवाह सोडून वन्यप्राणी चितळ शिकार केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून यातीत एक अरोपी फरार असल्याची कारवाई २ फेब्रुवारी रोजी रात्रोच्या सुमारास वनविभाग आलापल्ली, वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा कंसोबा अंतर्गत येत असलेल्या गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर परिसरात करण्यात आली. रामरतन बकिम मंडल, रा. विजयनगर ता.मुलचेरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर तन्मय बुधदेव बाडाई रा. विजयनगर ता. मुलचेरा असे फरार आरोपीचे नाव असुन त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामरतन मंडल व तन्मय बाडाई या दोघांनी गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर जंगल परिसारत १ फेब्रुवारी रोजी रात्रोच्या सुमारास विद्युत प्रवाह सोडून चितळाची शिकार केली. दरम्यान २ फेब्रुवारीला चितळाची शिकार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रामरतन मंडल याचे घरी रात्रीच्या सुमारास धाड टाकली असता तो चितळाचे मास शिजवतांना आढळून आला. वनकर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले व तन्मय बाडाई हा फरार झाला. आरोपीस मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास वन्यजीव संरक्षण कायादयान्वये १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास आलापल्ली उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया, सहाय्यक वनसंरक्षक आझाद यांच्य मार्गदर्षनात वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.इनवते व गुंडापल्ली उपक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आर. बानोत करीत आहे. दरम्यान जंगल परिसारत षिकारीचे प्रमाण वाढले असल्याने वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here