धानोरा नगरपंचायत येथील दुकान गाळे सर्वसामान्य लोकांच्या अवाक्या बाहेरच

25

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.०५ : अतिदुर्गम धानोरा शहरात नव्यानेच ४७ दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली परंतु त्यासाठी राबविलेली ई-लिलाव प्रक्रिया आणि त्यात टाकलेल्या किचकट अटि व शर्थी आम जनतेच्या अवाक्या बाहेर आणि आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने सदर दुकान गळ्याकडे लोकांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले असुन दुकान गाळे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. यावर शासनाने पुनर्विचार करुन अटि शिथिल करण्याची गरज असल्याचे मत मान्यवर उपस्थित करित आहेत. शासनाने गाळे बांधकाम करताना नगरपंचायतचा उत्पन्न वाढविणे, सर्वसामान्य लोकांना अगदी मार्फत दरात गाळे उपलब्ध करून देणे, जेने करुन बेरोजगारांना व्यवसाय करता येईल. शहरात उद्योगधंद्यात वाढ होईल. पण या सर्वच उद्देशाना हरताळ फासल्याचे दिसते.
डोंगराळ अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या धानोरा नगर पंचायत च्या वतीने आठवडी बाजार परिसरामध्ये एकूण ४७ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळ्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात गाळ्यांच्या साईज फेज १ साठी ८ गाळे असुन साईज १४.००चौ.मी.आहे. ना परतावा किमान अधिमुल्य रक्कम ३,४९००० (तिन लाख ऐक्कोनपन्नास हजार ) भाडे प्रति महिना २५००, अनामत रक्कम १,५००० लिलाव अनामत ५०,००० आहे.
फेज २ मध्ये ८ गाळे १४.०० चौ.मी.आहे. ना परतावा किमान अधिमुल्य रक्कम २,७२०७३ (दोन लाख बहात्तर हजार त्र्याहात्तर रुपये ) भाडे प्रति महिना २,५०० अनामत रक्कम १,५०,००० लिलाव अनामत ५०,००० आहे. येवढी मोठी रक्कम गुंतवून खरंच सर्वसामान्य लोक व्यवसाय सुरू करुन शकतो का?
पूर्वी लोक म्हणायचे उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी पण परिस्थिती बदलली तरीही मध्यम व्यापार कायमच असले तरी धानोरा येथे गाळे लिलावात घेऊन तिथे धंदा करने लोकांच्या आवाक्या बाहेरच असल्याने लोकांनी पाठफिरवल्याचे दिसून येते. धानोरा नगरपंचायत हद्दीमध्ये नव्यानेच शॉपिंग कॉम्प्लेक्स फेज १ – ८ गाळे, फेज २- ८ गाळे, शॉपिंग काँम्पलेक्स पहिला मजला २१ गाळे, चवेला रोड १० गाळे असे ऐकून ४७ गाळ्याचे बांधकाम करण्यात आले आहेत. या गाळ्यांच्या माध्यमातून गावातील स्थानिक तसेच सुशिक्षीत बेरोजगार यांना व्यवसाय उभारता येईल पण प्रशासनाला यांचे काहीच देणेघेणे नाही. मोठ्या शहरात पगडी देऊन गाळे किरायाच्या तत्वावर घेणे एकदाचे सोपे. पण येवढे पैसे मोजून किचकट अटि व शर्थीचे पालन करने सुद्धा कठिण काम दिसून येते. खरच नविन व्यवसाय सुरू होतिल काय ? मरणाराला मारायचे हिच निती दिसुन येते.
सदर ई निविदा प्रक्रियामध्ये कुठल्याच प्रकारचा सामान्य मानसाला न्याय मिळेल असा मुद्दा नसुन सदर गाळे प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने व सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर जातिल अशा पध्दतीने केली गेली आहे. त्याचप्रमाणे सामान्य माणसा पासून लपुन ठेवण्याचा प्रयत्न असल्याच्या लोकांच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. याच ई लिलावाला मुदत वाढवून दिली तरी यातिल अटि शर्थीत काय बदल होतो ते लवकरच कळेल आणि लोकांचा प्रतिसाद कसा असेल लवकरच पहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here