The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.०५ : येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुनांना वाव मिळावा त्यांच्यात आनंदमय उत्सव साजरा करता यावे या उद्देशाने आदिवासी वसतिगृहात “स्नेहसम्मेलन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धानोरा येथील मुलां – मुलींच्या आदिवासी वसतिगृहात दोन दिवसीय स्नेहसंम्मेलन कार्यक्रम ३ व ४ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक राहुलकुमार मीना (IAS) सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, यांचे हस्ते व्दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, १० वी व १२ ची परीक्षा जवळ असल्याने नियोजन पुर्ण अभ्यास करून नावलौकिक करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनामार्फत जे जनरल नालेजचे पुस्तके पुरवठा करण्यात आले त्याचा नियमित सराव करण्याच्या सुचना दिल्या तसेच वसतिगृहात मिळणाऱ्या सोईसुविधा बाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
दोन दिवसिय कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, एकलनृत्य, सामुहिकनृत्य, पथनाटय घेण्यात आले. पथनाटयच्या माध्यमातुन, व्यसनमुक्ती, मद्यप्राशनचे दुष्परिणाम व शेतकऱ्यांची पिळवणूक यावर प्रकाश टाकण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहातील शेवटचे वर्ष होते, त्यांचेकरिता निरोपसमारंभ कार्यक्रम घेण्यात आले. त्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाती आठवणी मनोगतातून व्यक्त केले. तसेच त्यांना इतर विद्यार्थ्यांकडून भेटवस्तु देण्यात आले.
स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांस राहुलकुमार मीना (IAS) व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांस बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अविनाश शेंबडवाड, तहसिलदार तहसिल कार्यालय, धानोरा तर प्रमुख पाहुणे म्हणून वहीद शेख, सहा. प्रकल्प अधिकारी, संजय वलके, नायब तहसिलदार, समीर कुरेशी, अनंत साळवे, जमीर कुरेशी, प्राध्यापक डॉ. लांजेवार, प्राध्यापक करमणकर, रोशन कावडकर, प्राध्यापिका सौ. इश्वरकर, सौ. देवकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वसतिगृह विद्यार्थीनी कृ. निकीता राउत, चि. प्रशिक मडावी आणि चि. हेमराज तुलावी यांनी केले.तर आभार प्रदर्शन वसतिगृह विद्यार्थीनी दिपाली फरदिया यांनी केले. वसतिगृहाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृहपाल कैलास उईके व गृहपाल कु. दिशा खोब्रागडे होते. कार्यक्रमाकरिता विद्यार्थी विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले.
