The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १९ : येथील जे एस पी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण १७ ते २१ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर प्राध्यापक कैलास खोब्रागडे, प्रा .टिकाराम धाकडे, भडके मॅडम उपस्थित होते .
या पाच दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला नरेंद्र कुंभारकर केंद्र प्रमुख ,भडके मॅडम रिसर्च पर्सन, समीर भजे सुलभक हे प्रशिक्षण देणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अभ्यासक्रम व विषय बदल याविषयी सविस्तर माहिती या प्रशिक्षण वर्गातून मिळणार आहे. या तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्गाला रांगी, पेंढरी, दुर्गापुर, मुरूमगाव केंद्र समाविष्ट असुन या केंद्रातील वर्ग ६ ते १२ ला शिकविणारे सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
