The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १९ : प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य, गुण असतात, त्या विकसित करण्याकरिता व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले जातात. शिबिराच्या माध्यमातून सहभागी असलेल्या सर्वांनीच व्यक्तिमत्व विकास साधावे. आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचा विकास करून त्यांना चांगल्या पद्धतीने इतरांन पुढे मांडता आलेत तरच व्यक्तिमत्व विकास शिबिर सफल झाल्याचे दिसून येईल. म्हणूनच व्यक्तिमत्व विकास शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राजू किरमिरे यांनी केले. ते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत होते.
साईबाबा ग्रामीण विकास शिक्षण संस्था चंद्रपूर अंतर्गत सुरू असलेल्या जेएसपीएम कॉलेज धानोरा येथे तीन दिवसाचे व्यक्ती महत्त्व विकास शिबिर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अनिवासी प्रशिक्षण आयोजित केले होते.
तीन दिवसीय अनिवासी विशेष शिबिर १६ ते १८ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले होते .
या अंतर्गत व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चुधरी, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दामोदर झाडे, शिबिराचे समन्वयक प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार मंचावर उपस्थित होते.
प्रा. डॉ गणेश चुधरी यांनी मराठी भाषेला अभीजात दर्जा मिळाला पाहिजे .असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी केले आणि कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रियंका पठाडे मॅडम यांनी केले .तर आभार डॉ. संजय मुरकुटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
