The गडविश्व
बिकानेर, दि. २० : जिममध्ये २७० किलो वजन उचलताना राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यष्टिका आचार्य असे घटनेत मृत्यू झालेल्या महिला खेळाडूचे नाव आहे. बिकानेरची महिला पॉवर लिफ्टर १७ वर्षीय खेळाडू (Weightlifter Yashtika Acharya) यष्टिकाचा २७० किलो वजनाचा रॉड मानेवर पडल्याने तिचा मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणे जिममध्ये ती सराव करीत होती यावेळी ही दुर्घटना घडली. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
यष्टिका रोजच्याप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत असताना तिच्या मानेवरील रॉड पडल्याने ती बेशुद्ध झाली. तिला जिममध्येच प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले . त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यष्टिका आचार्य हिचा जिममध्ये सराव करताना मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात असून बिकानेरच्या क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

https://x.com/AshwiniRoopesh/status/1892393736228794840?s=19