कुरखेडा: महिलेच्या विनयभंगाप्रकरणी माजी उपसरपंचास अटक

1143

– दोन दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २० : घरात प्रवेश करून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी माजी उपसरपंचास अटक करण्यात आल्याची घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. अनिल लक्ष्मण मच्छीरके (३८) असे आरोपी उपसरपंचाचे नाव आहे.
तालुक्यातील चिखली येथील माजी उपसरंपच अनिल मच्छीरके यांनी मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी गावातीलच एका विवाहित माहिलेच्या घरात प्रवेश करीत विनयभंग केला. याप्रकरणी संबधित महिलेने कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पेालीसांनी आरोपी विरोधात कलम ६१(१), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करीत तात्काळ अटक केली. दरम्यान बुधवार १९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीसा कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here