– जिल्हा संयोजक गुरुदेव भोपये यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : आगामी स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार असे आवाहन महामंच विकास आघाडी संघटनेचे गडचिरोली जिल्हा आयोजक गुरुदेव भोपये यांनी केले आहे. आज १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गडचिरोली येथील विश्रामगृहात महमंच विकास आघाडी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
संघटनेचे जिल्हा आयोजक यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये संयुक्त संघटना निमंत्रीत पदाधिकारी नाव सुचविण्यात यावे, महाआघाडी पैनल नावाने जाहीर करण्यात आले, जाहीरनामा तयार करून जाहीर करणे, तसेच संयुक्त संघटनाचे प्रमुख पदाधिकारी समोर नियम पाडणे, कोणत्याही पक्षाचालणारे संघटनेला सामाविष्ट करणे, आरक्षण प्रमाणे निवडून येणारे उमेदवाराला वार्ड किंवा प्रभाग मधून निवड करणे, कोणत्याही पक्षामध्ये समाविष्ठ नाही अशी लेखी हमी दयावी लागेल, संयुक्त संघटनांचे पदाधिकारी यांची रूपरेषा ठरविण्यात आली, उमेदवार स्वत: मर्जीने आपले कार्यकर्ते पाहून जाहीरनामा प्रसिद करतील व जाहीरनाम्यातील मुद्दे सुचविण्यात यावे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे संयुक्त संघटनाचे निमंत्रित पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.