सावली : घरकुलधारकाकडून मागितली लाच ; ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

820

The गडविश्व
सावली, दि. २६ : तालुक्यातील लोंढोली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने रक्कम देयके काढण्यासाठी प्रमाणपत्राकरीता ग्रामसेवकाने १० हजार रुपयांची लाच मागून ते स्वीकारण्याची तयारी दर्शल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यास अटक केल्याची कार्यवाही २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
तक्रारदार हे सावली तालुक्यातील लोंढोली येथील असून त्यांच्या वडिलांचे नावाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले, या योजनेतील सर्व प्रशासकीय कामे लोंढोली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके हे हाताळीत होते. दरम्यान पहिला हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली व बाकी हप्त्याचे देयकासाठी प्रमाणपत्रकरिता ग्रामसेवक रामटेके यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरून 25 फेब्रुवारी रोजी सापळा रचला असता त्यामध्ये ग्रामसेवक रामटेके यांनी तडजोडीअंती पहिले 10,000 व नंतर 10,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ग्रामसेवक रामटेके विरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा करून अटक करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, चा.पो.अं. संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here