– डॉक्टरांनी महिलेवर केली यशस्वी शस्त्रक्रिया, 2 वर्षांपासून सहन करत होती वेदना
The गडविश्व
रायपूर : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवला. या महिलेच्या पोटात सुमारे तीन किलोग्रॅम वजनाची फुटबॉलसारखी दिसणारी गाठ होती. शास्त्रकिया करून काढण्यात आली.
विशेष म्हणजे या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यास अनेक रुग्णालयांनी नकार दिला होता. दुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अशी गंभीर स्वरुपाची केस बरी करण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेचा जीव वाचवला. ही महिला आता आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे.
दुर्ग येथे राहणाऱ्या ममता निषाद या ट्यूमरच्या उपचारांसाठी गेल्या दोन वर्षांपासून भटकंती करत होत्या. या ट्यूमरमुळे होणाऱ्या तीव्र वेदना त्यांना असहाय्य होत होत्या. मात्र आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाल्यास लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.