गडचिरोली : महाशिवरात्रीच्या दिवशी वैनगंगा नदीपात्रात बुडून चौघांचा मृत्यू, तीन सख्ख्या बहिणींचा समावेश

3704

– आंघोळ करतांना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : आज महाशिवरात्रीच्या दिवशी वैनगंगा नदीपात्र आंघोळ करीत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या घडलेल्या घटनेमध्ये तीन सख्ख्या बहीनींचा तर एका युवकाचा समावेश आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अभिषेक संतोष (वय २४, रा. चंद्रपूर) असे मृत युवकाचे नाव आहे तर प्रतीमा प्रकाश मंडल (२३), कविता प्रकाश मंडल (२२), लीपीका प्रकाश मंडल (१८) रा. चंद्रपूर असे मृत तिघ्या बहिणींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेमध्ये चंद्रपूर येथील महाकाली वॉर्डात राहणारे अभिषेक संतोष, जितू दुर्गे (वय २०) व खुशाल सोनवणे (वय १८) हे तिघे आणि अन्य दोघे गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेसाठी येण्यास निघाले. दरम्यान मार्कडादेव येथे पोहचण्यापूर्वी वैनगंगा नदीच्या साखरी घाटावर ते तिघेही आंघोळीसाठी थांबले. जितू व खुशाल हे एका ठिकाणी, तर अभिषेक हा थोड्या अंतरावर आंघोळ करीत होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले. यावेळी तिघांनीही आरडाओरड करताच जवळ असलेल्या नागरिकांनी जितू व खुशाल या दोघांचा जीव वाचविला मात्र अभिषेक याला वाचविण्यात त्यांना यश आले नाही. दुर्दैवाने संतोषचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे पोलिस आणि एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अभिषेकचा मृतदेह शोधून काढला.
दुसऱ्या घटनेमध्ये, चंद्रपूर येथील मंडl परिवारातील सदस्य हे महाशिवरात्री निमित्ताने चंद्रपूर – गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीवरील नदी पात्रात आंघोळीसाठी वैनगंगा नदीच्या पुलाखाली गेले होते. आंघोळ करीत असताना प्रथमेशला पाण्याचा अंदाज न आल्याने डुबकी मारत असल्याचे दिसून आले. भावाला वाचविण्यासाठी तीन सख्या बहीणी प्रतीमा प्रकाश मंडल, कविता प्रकाश मंडल, लीपीका प्रकाश मंडल ह्या धावल्या मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात शीरल्या. सोबत त्यांचा लहान भाऊ व काकु सुध्दा होती. हे पाचही जण बुडत असताना आरडाओरड केली. तोपर्यंत बराच कालावधी लोटला होता.यावेळी सोबत असलेल्या काकाने प्रसंगावधान राखुन एका लहान मुलाला बाहेर काढुन तात्काळ प्राथमिक उपचार केल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश मीळाले. तर सोबत असलेली महीला पाण्याच्या प्रवाहाने वाहात जातांना नदीतील दगडाचा आधार घेऊन तब्बल एक तास पर्यंत ती तीथेच होती. यावेळी तालुक्यातील आपदा दलाच्या मदतीने संबंधीत महीलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर तीन सख्ख्या बहीनींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळपर्यंत दोन बहिणीचे मृतदेह मिळाल्याचे वृत्त आहे. पुढील तपास सावली पोलिस करीत आहे.
दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याने गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून खोल पाण्यात अंघोळीला जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #markhanda #markhandadev #mahshivratri2025 #markhandadevyatra #chamorshi #sawali #vaingangariver #vaingangamarkhanda #localnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here