महादेवगड यात्रेदरम्यान जप्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी

133

The गडविश्व
गडचिरोली – कुरखेडा दि. ०१ : अरततोंडी महादेवगड येथे महाशिवरात्री निमित्ताने आयोजित यात्रेला यंदाही तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती आणि मुक्तीपथतर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. यात्रेदरम्यान विविध दुकानांमधून जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली.

व्यसनमुक्त यात्रेसाठी विशेष उपक्रम

महादेवगड यात्रा व्यसनमुक्त व्हावी यासाठी सर्व दुकानदारांना पूर्वसूचना देत नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच, जाणीवजागृतीसाठी रॅली काढण्यात आली आणि तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे बॅनर यात्रास्थळी लावण्यात आले. पथनाट्याद्वारेही लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

तपासणी, दंड आणि जप्तीची कारवाई

यात्रास्थळी लावण्यात आलेल्या दुकानांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंड आकारण्यात आला. तसेच, जप्त केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची सार्वजनिकरीत्या होळी करण्यात आली.

उल्लेखनीय उपस्थिती

या उपक्रमात देवस्थान मंदिर समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मुक्तीपथतर्फे शारदा मेश्राम (तालुका प्रभारी संघटक), जीवन दहिकर (तालुका प्रेरक), महेश खोब्रागडे (स्पार्क कार्यकर्ता) यांच्यासह श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा येथील NSS विद्यार्थी व शिक्षक विखार, आरेकर, उराडे, डी.के. महाविद्यालय येथील NSS विद्यार्थिनी व शिक्षक शेंडे तसेच पोलीस विभागातर्फे नंदू मेश्राम आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here