The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात आय.सी.एम.आर सिकलसेल टीम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने १९ मार्च २०२५ रोज बुधवारला सिकलसेल ओपीडीचे नियोजन करण्यात येत असून डॉ. कल्पिता गावीत चंद्रपुर या ओपीडी साठी उपस्थित राहतील. सिकलसेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार – Folic acid, Hydroxyurea आणि इतर आवश्यक औषधी या ओपिडी मध्ये मोफत दिल्या जाईल. समाजातील गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर १००% सवलत प्रदान करित आहे.
विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. १९ मार्च रोजी होणार्या सिकलसेल ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
