The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकत्तर सेवक संघ आणि कार्यालय वेतन व भविष्य निर्वाह निधी विभाग (माध्यमिक), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिलीप विठोबाजी मेश्राम यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन २ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजता श्रीमती कमलताई मुनघाटे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सोनापूर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी २:०० वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे असतील, तर उद्घाटन सुधाकरराव अडबाले (शिक्षक आमदार, नागपूर विभाग) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उल्हास नरड (शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर), वासुदेव मेश्राम (शिक्षणाधिकारी, माध्यमिक, गडचिरोली), मोहनराव वारेकर (कार्यालयीन, राज्य शिक्षकत्तर महासंघ, पुणे), शशांक पन्ना (शिक्षकत्तर संघाचे मंडळ, गडचिरोली), सुमिताताई लडके (मुख्याध्यापिका, कमलताई मुनचाटे हायस्कूल, गडचिरोली) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकत्तर सेवक संघाने केले आहे. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाध्यक्ष अशोक काचीनवार, कार्याध्यक्ष संदीप भरणे, कोषाध्यक्ष अभिजित शिवणकर, तसेच संघाचे विविध पदाधिकारी आणि सदस्य यांनी केले आहे.
हा सोहळा गडचिरोलीतील शैक्षणिक क्षेत्रातील सेवकांसाठी विशेष महत्त्वाचा असून, दिलीप मेश्राम यांच्या उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्याची ही सुवर्णसंधी आहे.
