The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०२ : महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने मेंढालेखा येथे २६ मार्च रोजी बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती धानोरा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी कोमलवार यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत लेखाचे उपसरपंच महेंद्र उईके होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार श्रीमती लोखंडे, आरंभचे ब्लॉक कॉर्डिनेटर गौरव पेढे, क्राय संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर अंकुश राठोड, गोडलवाहीचे वैद्यकीय अधिकारी मोडक सर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण ढवळे, पोलीस पाटील सदाशिव दुगा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी नीलिमा गेडाम यांनी केले. संचालन चिमटे मॅडम यांनी तर आभार चिमुरकर मॅडम यांनी मानले. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका, लहान बालके व माता उपस्थित होते.
