– प्रथमच शिवजयंतीचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील आंबेशिवणी येथे जय शिवाजी युवा फ्रेंड्स ग्रूप च्या वतीने प्रथमच शिवजयंतीचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. येथील हनुमान मंदिरातील चौकात शिवजयंतीचा कार्यक्रम गावातील सर्व युवकांनी तसेच युवतींनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्नशील राहिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे ध्वजाचे झेंडावंदन आंबेशिवणी येथील सरपंचा सरिताबाई टेंभूर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील वैष्णवी हीचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला. तसेचज आंबेशिवनी येथील विर शहीद उमाकांत गणपत झरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण गावातील प्रतिष्ठित नागरिक संध्याताई झंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर लगेचच पाहुण्यांचे स्वागत युवा फ्रेंड्स ग्रुप आंबेशिवणी च्या वतीने करण्यात आले. गावातील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. युवा फ्रेंड्स ग्रूप चे सदस्य सुरज रमेश बाबनवाडे यानी प्रास्ताविक करतांना मंडळाचे उद्देश सांगताना म्हटले की येत्या दोन वर्षात आंबेशिवणी येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार तसेच वीर शहीद उमाकांत गणपत झरकर यांचा सुद्धा पुतळा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळच उभारण्याची ग्वाही दिली व जय शिवाजी युवा मंडळ केवळ तात्पुरता मंडळ नसून गावविकासाठी नेहमी तत्पर राहील. तसेच युवा फ्रेंड्स ग्रुप चे सदस्य सुरज बाबनवाडे यांनी आजपर्यत मोफत रुग्णसेवा २८८ गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केलेला आहे व नेहमी युवा फ्रेंड्स ग्रुप चे पूर्ण सदस्य रक्तपुरवठा करण्याकरिता नेहमी तत्पर राहणार.
पुढे बोलतांना गावचे उपसरपंच योगाजी कुडवे यांनी युवा फ्रेंड्स ग्रुप हा चांगल्या मार्गाने यशस्वी पावूल उचलेला आहे व यांना नेहमी सहकार्य व्यक्त केलेले आहे. तसेच डॉ. पवन राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपल्या वक्तव्यात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच युवा फ्रेंड्स ग्रुप ची साक्षी पाल हिने महिलांविषयी नागरिकांना आई बहिणी विषयी आदर असावा व नेहमी चांगल्या विचारांची देवाण घेवाण करून आयुष्य हे शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर करून जिवन जगण्याचे आवाहन आपल्या वक्तव्यात बोलतांना सांगीतले. त्यानंतर अध्यक्षीय भाषन गावचे पोलीस पाटील शरद भैसारे यांची गावची ऐकात्मता टिकविण्यासाठी गावातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासारखे आपल्या गावात आत्मसात करावे तसेच गावातील तंटे मुक्त गाव म्हणून नावाजला पाहिजे असे बोलतांना सांगितले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवेंद्र भैसारे हे होते तर यावेळी गावचे सरपंचा सरिताताई टेंभुर्णे, उपसरपंच योगाजी कुडवे, तंटामुक्त अध्यक्ष मोहनजी पाल , डॉ.पवन राऊत , ग्रा. पं. सदस्या संध्याताई झंजाळ, अंगणवाडी सेविका मंगळताई झंजाळ, काजूबाई उंदीरवाडे, सर्च सेविका, घनश्याम गावतुरे , ग्रा.पं सदस्य विलास झंजाळ, विठ्ठल बोरुले, प्रशांत भैसारे, महिला सदस्य झजाळ, वकील अमित झंजाळ, ठिकाराम राऊत, यशवंत पेंदोरकर, मठे जी, इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच जय शिवाजी युवा फ्रेंड्स ग्रूप आंबेशिवणी चे अध्यक्ष प्रदीप झंजाळ, उपाध्यक्ष विजय मट्ठे, कोषाध्यक्ष संकेत झंजाळ, सचिव
सुरज बाबनवाडे, सल्लागार सुरज पाल, मार्गदर्शक कार्तिक काळबांधे, पवन झंजाळ,आदित्य गावतुरे,सचिन म्हशाखेत्री ,सचिन वाढई ,भवन चापले,चेतन झंजाळ,प्रणाल झंजाळ ,विक्की वाढनकार ,बालाजी चापले ,प्रशांत पाल ,अविनाश झंजाळ तसेच युवा फ्रेंड्स ग्रुप आंबेशिवणी येथील युवती सदस्य श्रद्धा झंजाळ,प्रणोती झंजाळ,आचल झंजाळ,अंकिता झंजाळ ,दिव्यानी झंजाळ,सायली बाबनवाडे, गायत्री पाल,साक्षी पाल,सायली वाढणकार,सोनी वाढाई,प्रांजली लोणारे, जयश्री चौधरी, ऐश्वऱ्या चापले, इत्यादी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार अतुल राउत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता गावातील सर्व नागरिक ,महिला , युवक, युवती यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम आनंद उत्साहात पार पडले.